बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील लॉकडाउनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले….

पुणे | कोरोनाने सगळीकडे हैदोस घातला आहे. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत आहेत. प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या पुण्यात सध्या आकडेवारी काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसत आहे. मात्र नवीन रूग्णही रोज 2000 च्या वर सापडत आहेत. मुंबई हायकोर्टाने पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली असून पुणे तसंच रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या इतर शहरांमध्ये लॉकडाउन लावण्याची सूूचना मुख्यमंत्र्यांंना दिली. यावर आज झालेल्या बैठकीनंतर अजित पवारांनी लॉकडाउनबाबत माहिती दिली.

काही लोकप्रतनिधींनी लॉकडाउनची करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे. सकाळी काही दुकानं उघडी असतात. लोक वेगवेगळी कारणं देतात त्यामुळे पोलिसांची अडचण होते पण आत्ता आहे तशाच पद्धतीने चालू ठेवून कडक निर्बंध करावेत अशा सूचना दिल्या असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली त नक्कीच निकाल चांगला मिळेल. ग्रामीण भागात सध्या रुग्णसंख्या जास्त दिसत असून पुण्यात रुग्ण थोडे कमी झाले असल्याचं अजित पवार म्हणाले. यावेळी बोलताना अजित पवारांनी हायकोर्टाच्या सूचनेवर बोलण टाळलं आणि मुख्यमंत्री त्यावर बोलती असं सांगितलं.

दरम्यान, दुसऱ्या लाटेत जी धावपळ करावी लागली ती वेळ तिसऱ्या लाटेत येऊ नये यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा उभ्या करण्याची गरज आहे ते हातात घेतलं आहे, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवार मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत ते फडणवीसांनी दिलं, तेही आघाडीला टिकवता आलं नाही”

मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात नरेंद्र मोदींना भेटू- अजित पवार

“मराठा समाजाने आता आंदोलन नाही, लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा”

कोरोनाबाधितांसाठी विरुष्काचा मदतीचा हात; ‘इतक्या’ कोटींची केली मदत

संकटं आल्यामुळेच मी घडले- सिंधूताई सपकाळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More