विद्यार्थ्यांचं आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत आहे- देेवेंद्र फडणवीस
मुंबई | एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. जळगाव आणि पुणे जिल्ह्यातील एमपीएससीच्या उमेदवारांनी निषेध व्यक्त केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका होत आहे. अशातच यावर विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणार्या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. त्यासोबतच त्यांनी एका माध्यमालाही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय पक्षांच्या रॅल्या चालू आहेत, आंदोलन चालू आहेत. परीक्षेमध्ये तर सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात असतं. सरकारने दिलेलं कोरोनाचं कारण अतिशय तकलादू असल्याचं फडणवीस म्हणाले. त्यासोबतच जर सरकारने कोरोनाच्या कारणाने परीक्षा रद्द केली असेल तर हे चुकीचं होणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. यासोबतच भाजपमधील अनेक नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, ठाकरे सरकारने MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचं खरं कारण आधी सांगावं. सरकारला कोरोनाची भीती असेल तर मग त्यांना बाकीचे कार्यक्रम आणि बाकीच्या परीक्षा कशा चालतात? हे सरकार प्रचंड गोंधळलेलं आहे, अशा म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे.
एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणार्या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा! #MPSC @CMOMaharashtra
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 11, 2021
थोडक्यात बातम्या-
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपला कणा दाखवून एमपीएसच्या परीक्षा वेळेवरच घ्या”
“फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार रात्रीच्या पार्टीमध्ये नाही”
2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान असणार- कंगणा राणावत
मुंबईची पहिली माफिया क्वीन गंगुबाईची जाणून घ्या खरी कहाणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘या’ ठिकाणी घेतली कोरोनाची लस
Comments are closed.