बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना झालेल्या मुलांना अजिबात देऊ नका ‘हे’ औषध; केंद्राच्या कोरोना उपचारासंबंधी मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपला जीव गमावला. अनेक शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. या लाटेचा लहान मुलांना अधिक धोका असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लहान मुलांवरील कोरोनाच्या उपचारासंबंधी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरूवातीला उपचारासाठी रेमडेसीवीर इंजेक्शन देण्यात येतं होतं. मात्र काही दिवसांनी आरोग्य मंत्रालयाने इंजेक्शन वापरावर बंदी घातली होती. तशाच प्रकारे आता मुलांवर उपचार करताना रेमडेसीवीर इंजेक्शनचा वापर करू नये असा सल्ला आरोग्य सेवा संचालनालयाने दिला आहे. याबाबत एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली.

दुसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झालेल्या आणि रूग्णालयात दाखल झालेल्या 60-70 टक्के मुलांमध्ये दुसरी सहव्याधी होती. त्यासोबतच त्यांची प्रतिकारशक्ती कमी होती. ज्या निरोगी मुलांना कोरोनाची लागण झाली ती लवकर बरी झाल्याचं रणदीप गुलेरिया म्हणाले.

दरम्यान, 12 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी पालकांच्या देखरेखीखाली सहा मिनिटांची वॉक टेस्ट घ्यावी. ऑक्सिमीटर लावून मुलाला मुलाला सतत सहा मिनिटे चालण्यास सांगावं. यामुळे त्याच्या ह्रदयाची गती, श्वसनाचा वेग आदी बाबी कळू शकतील.

थोडक्यात बातम्या- 

शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतच्या बिनव्याजी कर्जासह मंत्रिमंडळाच्या बैठकीतील 6 मोठे निर्णय

धक्कादायक! कोरोनानंतर आणखी एक जीवघेणा व्हायरस आला समोर, ‘या’ ठिकाणी सापडला पहिला रुग्ण

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर; आता मिळणार एवढ्या लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

ग्रेट ग्रँड मस्तीमधील अभिनेत्रीने ट्रेनरचे घेतलेले पंचेस पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

“मुंबईत सगळं काही ब्रिटिशांनी केलं, मग शिवसेनेनं काय केलं?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More