बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमेरिकेच्या अध्यक्षांनी दिला थेट पाकिस्तानला इशारा; म्हणाले…

अहमदाबाद | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात दाखल झाले. पंतप्रधान मोदींनी त्यांचं मोठ्या आदराने स्वागत केलं. यावेळी ट्रम्प यांनी उपस्थितांना संबोधित केलं. आपल्या भाषणात त्यांनी पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे.

दहशतवादापासून नागरिकांना वाचवण्यासाठी आम्ही दोघे मिळून एकत्र काम करू. आम्ही मिळून सीमेपलीकडील दहशतवाद संपवण्याचा प्रयत्न करू, असं ट्रम्प यांनी म्हटलंं आहे.

कट्टरपंथी इस्लामी दहशतवादाच्या धोक्यापासून नागरिकांना वाचवण्यासाठी दोन्ही देश एकत्रित आहेत. माझ्या प्रशासनात आम्ही आयसिसच्या रक्तरंजित मारेकऱ्यांचा पूर्ण खात्मा केला. आम्ही राक्षस अल बगदादीला कंठस्नान घातलं, असल्याचं ट्रम्प यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

दरम्यान, आम्ही हा भारावून टाकणारा पाहुणचार नेहमी लक्षात ठेवू. भारतासाठी आमच्या अंतःकरणात विशेष स्थान आहे, अशाही भावना ट्रम्प यांनी व्यक्त केल्या.

ट्रेंडिंग बातम्या- 

इंदोरीकर महाराज नगर जिल्ह्याचं भूषण आहेत- सुजय विखे

महाविकास आघाडीने अजित पवारांकडे सोपवली आणखी एक महत्वाची जबाबदारी

महत्वाच्या बातम्या- 

महाविकास आघाडीने अजित पवारांकडे सोपवली आणखी एक महत्वाची जबाबदारी

दहा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सचिननं घडवला होता सर्वोच्च इतिहास

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणातील सर्व मुद्दे एकाच ठिकाणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More