बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! टिकटॉक स्टारपेक्षाही खरतनाक कावळ्याचा ‘कॅटवॉक’, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशा व्हिडीओंना प्रचंड लाईक्स, कमेंट्स करुन त्यांना मोठ्या प्रमाणात शेअर देखील केलं जातं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक कावळा कॅटवॉक करताना दिसत आहे. याआधी आपण आयोजित केलेले मांजरांचे रॅम्प पाहिले. ज्यामध्ये मांजर कॅटवॉक करताना दिसल्या.  मात्र आता चक्क एक पक्षी कॅटवॉक करत आहे.

कावळा अगदी छान पद्धतीने कॅटवॉक करताना दिसत आहे. आयएफएस ऑफिसर सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये कावळा एका छोट्या भिंतीवर चालताना दिसत आहे आणि तिथली जागा मर्यादित आहे.

त्यामुळे अशी पावलं टाकतो जेणेकरून तो खाली पडणार नाही. तो आपलं एकेएक पाऊल पुढे टाकत असतो त्यावेळी त्याची मागची शेपटीही खूप सुंदर हलते. पुढे येऊन तो थांबतो. मात्र त्याच्या या चालीने नेटकऱ्यांना वेड लावलं आहे.

दरम्यान, हा संपुर्ण व्हिडीओ लोकांच्या प्रचंड पसंतीला आला असून सुशांत नंदा यांनी व्हिडीओला अशा अॅटिट्यूडसह मी लिमिटेड एडिशन आहे, असं कॅप्शन दिलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘…म्हणून तर आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण झाली नाही ना?’; भाजप नेत्याचा सवाल

“देवेंद्र फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत”

देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला- नाना पटोले

कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या 10 शहरांपैकी 9 शहरं महाराष्ट्रातली, केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये!

“एका व्यक्तीनं जरी त्रास दिल्याचं दाखवून दिलं तर उमेदवारी अर्ज भरणार नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More