बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फडणवीसांनी त्यांचं दिल्लीतील वजन वापरून बैलगाडा शर्यतीचा प्रश्न मार्गी लावावा”

पुणे | राज्यातील बैलगाडा शर्यती गेल्या काही वर्षांपासून बंद आहेत. बैलगाडा शर्यती परत चालू करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले. या मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे आता बैलगाडा शर्यतीचे प्रयत्न पहिल्यापासुन करावे लागणार आहेत. याविषयी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरषोत्तम रूपाला यांची भेट घेतली आहे. बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतुन वगळावा ही मागणी त्यांनी या भेटीत केली आहे.

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. काही दिवसांपुर्वी बैलगाडा शर्यतीची बंदी उठवण्यासंदर्भात बैलगाडा शर्यती संघटनेच्या अध्यक्षांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीत चांगलं वजन आहे. त्यांनी पक्षभेद बाजूला ठेऊन त्यांनी आमच्यासोबत पुरषोत्तम रूपाला यांच्याकडे यावं. केंद्रात त्यांच्याच पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेऊन बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यासाठी फडणवीसांनी संबंधित मंत्र्यासोबत चर्चा करुन मार्ग काढावा, असं अमोल कोल्हे म्हणाले.

बैलगाडा शर्यतींचा थरार आणि परंपरा ही फार वर्षापासून सुरू आहे. शेतकरी हा आर्थिक भार सोसत बैलांचे योग्य संगोपण करत असतो. शेतकरी बैलांची कशारितीने काळजी घेतो या संदर्भात अमोल कोल्हे यांनी पशुसंवर्धन मंत्री पुरषोत्तम रूपाला यांना यासंदर्भात व्हिडीओ दाखवला.

दरम्यान, बैलगाडा शर्यतीला 400 वर्षांची परंपरा आहे. बैलगाडा शर्यत महाराष्ट्राची संस्कृती आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चांगली चालना मिळू शकते आणि पर्यटनासही चालना मिळू शकते. आंतरराष्ट्रीय पर्यटकसुद्धा आकर्षित होऊ शकतात असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

महिलांबद्दल ‘हा’ प्रश्न विचारताच तालिबानी हसायला लागले, ‘हा’ व्हिडीओ व्हायरल!

अफगाणिस्तानमध्ये जन्मलेल्या आर्शी खानला सतावतेय नातेवाईकांची चिंता, म्हणाली…

‘या’ पठ्ठ्याने पुण्यात स्थापन केलं चक्क मोदींचं मंदिर, पाहा व्हिडीओ

भाजपने राज्यातून 40 मंत्री केले तरी शिवसेना संपणार नाही- उदय सामंत

‘NDA परीक्षेत महिलांना संधी द्या’; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More