चेन्नई | भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा कसोटी सामना चालू आहे. यामध्ये सामनाच्या पहिल्या दिवशी भारताने पहिल्या डावात 329 धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाचा डाव 134 धावात गुंडाळला. फीरकीपटू आर.आश्विनच्या जाळ्यात अर्धा पाहुणा संघ माघारी धाडला.
भारताने इंग्लंडला कमी धावात रोखलं यामध्ये भारतीय संघाने क्षेत्ररक्षण करताना कोणतीही चूक केली नाही. यामध्ये यष्टीरक्षक पंतने अप्रतिम झेल घेतले. तर भारतीय संघाचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंंक्य रहाणेनेसुद्धा हवेत उडी घेत झेल घेतला.
इंग्लंडची आघाडीची फळी गडगडल्यावर अष्टपैलू मोईन अली अतिशय संयमी खेळी करत होता. मात्र त्यानंतर अक्षर पटेलच्या गोलंदीजावर तो अडखळला. चेंडू अचानक उडला आणि चेंडू बॅटच्या कडेला लागत ऋषभ पंतकडे गेला. पण त्याला काही समजण्याआधीच चेंडू त्याच्या मांडीला लागून उडाला.
दरम्यान, पंतच्या बाजूला उभा असलेल्या रहाणेने चेंडूकडे आपली नजर ठेवली. चेंडूच्या दिशेने हवेत झेप घेतली आणि त्यानंतर चेंडू पकडला. आजचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारत फलंदाजीला आला असून एक गडी गमावत रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा नाबाद आहेत.
Moeen Ali gone! Another great catch, this time by Rahane off the bowling of Axar Patel #INDvsENG #ENGvIND #cricket #wicket pic.twitter.com/D4QvaHxrfP
— AmirCXN (@cxn_amir) February 14, 2021
थोडक्यात बातम्या-
“संजय राठोडसोबत तिचं नाव जोडू नका, आमच्या पूजाचे कोणासोबतही संबंध नव्हते”
“पूजा चव्हाण प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख गप्प का?”
“रोहिणीताई, राष्ट्रवादीने तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू”
शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर चंद्रकांत पाटलांचा पडळकरांना सल्ला, म्हणाले…