बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“प्रभू श्रीराम एक महापुरूष होते हे मी मानत नाही”; माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य!

नवी दिल्ली | देशातील बहुतांश लोकांचं श्रीराम हे श्रद्धास्थान आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी प्रभु श्रीराम एक महापुरूष होते हे मी मानत नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मध्यप्रदेश येथील महाविद्यालयीन अभ्यासक्रमात रामचरित मानस समाविष्ट करण्यात आलं आहे.

भाजपकडुन या वक्ताव्याचा समाचार घेण्यात आला आहे. अयोध्येत असलेल्या श्रीराम जन्मभुमीचे पुरावे पुरातत्त्व खात्याला मिळाले आहेत. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन करणाऱ्या नासा या संस्थेने देखील राम सेतु मान्य केला आहे, असं प्रत्युत्तर भाजपचे प्रवक्ते रंजन पटेल यांनी दिल आहे

रामायण काल्पनिक आहे आणि श्रीराम महापुरूष होते हे मानत नाही, असं म्हटल आहे. परंतु, रामायणातील ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यातुन काहीतरी शिकण्यासारख आहे, असं जीतन राम मांझी म्हणाले. तसेच रामायणाचा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करण चांगली बाब असल्याचं रंजन पटेल म्हणाले.

दरम्यान, रामायणाचा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करण चांगली बाब आहे. कॉलेजमधील मुलांना चांगल्या गोष्टी शिकायला भेटतील, असं मत त्यांनी व्यक्त केले आहे.  देशात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

जगप्रसिद्ध असलेल्या IPLला ‘या’ देशात प्रसारणावर बंदी, कारण वाचून व्हाल हैराण!

“राज्यात इतक्या घटना घडतात तरीही सरकार षंढासारखं बसलंय”

‘हे’ लक्षण आढळलं की कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येते- उदयनराजे भोसले

दीपक हुड्डाला मोठा धक्का; बीसीसीआय करणार हुड्डाची चौकशी

“ही तर राज्य सरकारची अपरिपक्वता, राज्यपालांना पत्र पाठवताना खातरजमा केली पाहिजे होती”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More