बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार भाडोत्री चाणक्याची भेट घेतात याचा अर्थ त्यांच्या राजकारणाचा अस्त”

कोल्हापूर | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी दुसऱ्यांदा भेट घेतली. या भेटीची देशभर चर्चा असून या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. अशातच या भेटीवरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांना प्रशांत किशोर यांसारख्या भाडोत्री चाणक्याची भेट घ्यावी लागत आहे याचा अर्थ त्यांच्या राजकारणात अस्त होतोय, अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी पवारांवर टीका केली आहे. कोल्हापूरमध्ये ते बोलत होते.

गोपीचंद पडळकरांनी यावेळी बोलताना मराठा आरक्षणावरून शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही टीका केली. हे चुलता पुतण्याचं भ्रष्टाचारी सरकार आहे. मागासवर्गीय उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार कसे होऊ शकतात?, हा मनमानी कारभार चालला आहे. उपसमितीचं नेतृत्व अजित पवारांकडे दिलं. कोणतीही चर्चा न करता त्यांनी काम केलं, हे काँग्रेसवालेच सांगत असल्याचं  गोपीचंद पडळकर  म्हणाले.

दरम्यान, मराठा समाजाच्या ताटात माती टाकण्याचं काम ठाकरे सरकारने केलं आहे. बहुजन्यांवर अन्याय करण्याचं सरकारचं षडयंत्र आहे. काँग्रेसचंसुद्धा काका-पुतण्यासमोर काही चालत नसल्याचा टोला पडळकरांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द; ‘या’ दिवसापासून घेता येणार ऑनलाईन दर्शन

बच्चू कडूंचा गनिमी कावा! वेशांतर करुन शासकीय कार्यालयात गेले अन्…

मराठा आंदोलनावर खासदार संभाजीराजे यांची मोठी घोषणा, म्हणाले….

मोठी बातमी! शिवसेना आमदार संजय रायमुलकरांनी ‘या’ कारणाने घेतली धरणात उडी; पाहा व्हिडीओ

“भाजप कृतघ्न, बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला पाहवत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More