नवी दिल्ली | काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिलेल्या राजीनाम्यानं काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. काँग्रेसमधील अनेक नेते शिंदेना दोष देत आहेत. तर काहीजण शिंदेच्या समर्थनार्थ बोलत आहेत. यादरम्यान ज्योतिरादित्य यांच्या मुलाने ज्योतिरादित्यांना ट्विट करत आपला पाठिंबा दर्शविला आहे.
मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. संपूर्ण कुटुंब तुमच्या पाठिशी आहे. एक वारसा सोडायला हिंमत लागते. माझं कुटुंब कधीही सत्तेसाठी भुकेलं नव्हतं. आम्ही वचन दिल्याप्रमाणे भविष्यात देशात आणि मध्य प्रदेशात प्रभावी बदल घडवू, असं महाआर्यमानं म्हटलं आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवला.
दरम्यान, ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर भाजपानं संध्याकाळी सीईसीची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये सहभागी होतात की नाही याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
I am proud of my father for taking a stand for himself. It takes courage to to resign from a legacy. History can speak for itself when I say my family has never been power hungry. As promised we will make an impactful change in India and Madhya Pradesh wherever our future lies.
— M. Scindia (@AScindia) March 10, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
‘महाविकास आघाडीचा मोठा नेता आमच्या संपर्कात’; लवकरच महाराष्ट्रात भूकंप?
महत्त्वाची बातमी – पुण्यातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली
महत्वाच्या बातम्या-
मी येतोय, तुम्ही सराव सुरु करा; आव्हाडांनी गणेश नाईकांना ललकारलं!
“शिक्षण म्हणजे वाघीणीचं दूध… सध्या या वाघीणीच्या दुधात पाणी मिसळल्यासारखं वाटतंय”
काका जरा जपून…, भाजप आमदाराचा शरद पवारांना इशारा
Comments are closed.