Top News खेळ

नाद करा पण जडेजाचा कुठं! आपल्या रॉकेट थ्रोने शतकवीर स्मिथला दाखवला तंबुचा मार्ग; पाहा व्हिडीओ

सिडनी | भारत-ऑस्ट्रोलियामध्ये चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला 338 धावांमध्ये रोखलं. या त्रिशतकी धावसंख्येत फलंदाज स्टिव स्मिथने शतकी खेळी करत चांगलाच तळ ठोकला होता.

तळाच्या फलंदाजांच्या सोबतीनं स्मिथ धावसंख्या वाढवत होता. शतक झाल्यानंतर स्मिथने आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. स्मिथने बुमराहला खणखणीत चौकार मारले. त्यामुळे ऑस्ट्र्लिया 350 धावांचा पल्ला गाठणार असं वाटत असताना सर जडेजाने आपल्या रॉकेट थ्रोने शतकवीर स्मिथला दाखवला तंबुचा मार्ग दाखवला.

बुमराहच्या षटकात स्मिथने चेंडू टोलावला आणि साथी हेजलवूडला दोन धावांसाठी कॉल केला. मात्र डीप स्केवअरला क्षेत्ररक्षण करत असलेल्या जडेजाने अचूक थ्रो करत स्मिथला धावबाद केलं.

दरम्यान, मी आत्तापर्यंत जे रन आउट केले आहेत, त्यातील हा सर्वोत्तम रन आउट  असल्याचं जडेजाने म्हटलं आहे. दुसऱ्या दिवशी भारताच्या 2 बाद 96 धावा झाल्या आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

“माझ्या ट्वीटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील असं मला वाटतं नाही

“मला धक्के देण्याची सवय, कधी दुसऱ्याला बसतो तर कधी मलाच”

94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार नाशिकला!

“डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही”

‘आयुक्त साहेब जरा याचंही उत्तर द्या’; विशाल तांबेंचं आयुक्तांना पत्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या