बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रॉकस्टार जडेजा! जडेजाने एका षटकात काढल्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा, पाहा व्हिडीओ

मुंबई | रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्जमधील सामन्यात चेन्नईच्या अष्टपैलू रविंद्र जडेजाने घातक फलंदाजी केली आहे. जडेजाने फलंदाजी करताना बंगळुरूच्या हर्षल पटेलच्या अखेरच्या षटकात तब्बल 37 धावा काढल्या आहेत.

शून्यावर फलंदाजी करत असताना जीवदान लाभलेल्या जडेजाने बंगळुरूचा घाम काढला. जडेजाने 28 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 62 धावांची खेळी केली. याआधी ख्रिस गेलने पुणे वॉरियर्सच्या परमेश्वरनला एका षटकात 37 धावा कुटल्या होत्या.

रवींद्र जडेजाच्या वादळी खेळीमुळे चेन्नईने बंगळुरुसमोर विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.चेन्नईने 4 गडी गमवून 191 धावा केल्या. त्यात फाफ आणि जडेजाचे अर्धशतकही आहे. जडेजाने गोलंदाजीतही कमाल केली आहे. आपल्या 4 षटकांमध्ये त्याने फक्त 13 धावा देत 3 गडी बाद केले. त्यासोबतच 1 षटक निर्धावही टाकलं.

दरम्यान, रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्जमधील सामन्यात चेन्नईने बंगळुरूवर 69 धावा आणि 13 चेंडू राखून विजय मिळवला आहे. अष्टपैलू जडेजाच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर चेन्नईने यंदाच्या मोसमात अपराजित असलेल्या बंगळुरूचा पराभव केला आहे. चेन्नईने हा सामना जिंकत गुणतालिकेत सरशी साधत पहिला नंबर मिळवला आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

पत्नीसाठी रुग्णवाहिकेची वाट पाहून वैतागलेल्या पतीने केलं ‘हे’ कृत्य

“मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेमध्ये दहा वर्षात जी प्रगती केली नाही ती मोदींनी पाच वर्षात केली”

दादा-भाईंना दणका, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘या’ दोन मोस्ट वॅान्टेडला ठोकल्या बेड्या!

सोनम गुप्तानंतर आता पुष्पाचा संदेश चर्चेत; म्हणते दिपुजी मला पळवून न्या!

मोठी बातमी! राज्यातील भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याचं कोरोनाने निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More