Top News महाराष्ट्र मुंबई

“माझ्या ट्वीटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील असं मला वाटतं नाही”

मुंबई | प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कंगणाला आणि रंगोलीला वांद्रे पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितलं होतं.

कंगणा राणावत आणि रंगोली दुपारी 1 ला स्टेशनला हजर राहिल्या होत्या. जवळजवळ 2 तास दोघींची चौकशी चालू होती. त्यानंतर दोघींनी आपला जबाब स्टेशनमध्ये नोंदवला आहे.

मी केलेलम ट्वीट काही गैर नाही. ट्विटर हे एक सोशल मीडिया प्लेटफॉर्म आहे. त्यामुळे तिथे अनेक ट्विट केले जातात माझ्या ट्वीटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, असं मला वाटत नसल्याचं कंगणाने पोलिसांना उत्तर देताना म्हटलं असल्याची माहिती आहे.

दरम्यान, कंगणाने अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अनेक ट्विट केले होते. यामधील एका ट्विटवर  साहिल नावाच्या एका व्यक्तीने वांद्रे न्यायालयात कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात याचिका दाखल केली होती.

थोडक्यात बातम्या-

“मला धक्के देण्याची सवय, कधी दुसऱ्याला बसतो तर कधी मलाच”

94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार नाशिकला!

“डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही”

‘आयुक्त साहेब जरा याचंही उत्तर द्या’; विशाल तांबेंचं आयुक्तांना पत्र

‘…केलं ना तुमचं काम, आता सत्कार कशाला यामुळेच तुम्ही मागं राहता’; अजित पवार भडकले  

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या