बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्हाला जर फाटकी जीन्स घालायची असेल तर कूल दिसा भिकाऱ्यासारखं नाही”

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगणा बिनधास्तपणे आपली मत मांडत असते. अशातच सध्या फाटक्या जीन्सवरून चालू असलेल्या वादात कंगणाने उडी घेतली आहे. कंगणानेही जीन्स फाटक्या घालाव्यात पण कशा प्रकारच्या घालाव्यात यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जर तुम्हाला फाटलेली जीन्स परिधान करायची असेल तर ती तुम्हाला या फोटोमध्ये जसे दिसत आहेत त्याप्रमाणे तुम्ही कूल दिसायला पाहिजे, भिकारी असल्यासारखे नाही, असं कंगणाने म्हटलं आहे. यासंदर्भात तिने ट्विट केलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी फाटक्या जीन्सवरून महिलांवर निशाणा साधला होता.

एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना जवळच घेऊन बसलेली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं तुम्ही कुठे जात आहात? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला. मी पुढे चौकशी केली तर त्या महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल, असं तीरथ सिंह रावत म्हणाले होते. यावरून त्यांच्यावर निशाणा साधला जात होता. त्यांच्या याच वक्तव्यावर कंगणाने आपलं मत ट्विटद्वारे मांडलं आहे.

दरम्यान, कंगणाने ट्विट करत तिचे फाटक्या जीन्सवरचे फोटो पोस्ट केले आहेत. सध्या तिचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!

विराटपेक्षा रोहितच लय भारी! संघाची सूत्र हाती आल्यावर निसटलेला सामना आणला खेचुन

वाह! क्या बात है ‘कजरारे’ गाण्यावर कृणाल पंड्याने लावले पत्नीसोबत ठुमके, पाहा व्हिडीओ

सोने विक्रीबाबत सरकारचा ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

कोरोनाचा संसर्ग वाढला, महाराष्ट्र नंतर ‘या’ राज्याने लागू केले कठोर निर्बंध

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More