Top News देश

“80 वर्षाचे शरद पवार बाहेर फिरतात मग मुख्यमंत्री घरात का बसलेत?”

नवी दिल्ली |  80 वर्षाचे शरद पवार बाहेर फिरतात मग मुख्यमंत्री घरात का बसलेत?, असं म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. संसदेच्या अधिवेशनानिमित्त दिल्लीत असलेल्या नवनीत राणा माध्यमांशी बोलत होत्या.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करत राज्याचा ताबा आता केंद्राने घ्यायला हवा. राज्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे तरीही मुख्यमंत्री मात्र आपल्या निवासस्थानात बसून आहेत ते मातोश्रीच्या बाहेर पडत नसल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी ड्रग्जवरून धक्कादायक असं वक्तव्य केलं आहे.

फक्त बॉलिवूडला टार्गेट केलं जात आहे, मात्र या बॉलिवूड-टॉलिवूडने आमच्यासारख्या अनेक कलाकारांना नाव आणि प्रसिद्धी दिली आहे. आपण कोणत्याच क्षेत्राला संपूर्णपणे दोषी ठरवू शकत नाही. काही राजकीय नेत्यांची मुलेही ड्रग्ज घेतात. क्रिकेटचा तर ड्रग्जशी जुनाच संबंध आहे. एखाद्या क्रिकेटपटूने ड्रग्ज घेतल्याचं आपण अनेकदा ऐकतो, असं नवनीत राणा म्हणाल्या.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी घराबाहेर पडत नाही, असं शिवसेनेचे नेते आणि खासदर संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांचे आणि पंतप्रधानांचे प्रोटोकॉल वेगवेगळे असल्याचं राणा यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

फक्त तुम्ही काळजी घ्या, कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही- अशोक चव्हाण

“अजून 2 वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही”

‘कंगणाला भेटणारे राज्यपाल, कांदयासाठी शेतकरी पुत्रांना भेटणार का?’; किसानपुत्राचं राज्यपालांना पत्र

अनेक राजकारणी आणि क्रिकेटरसुद्धा ड्रग्ज घेतात- नवनीत राणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या