बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुमार फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव, राहुलचं दमदार अर्धशतक

मुंबई | मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्समधील सामन्यात पंजाबने 9 गड्यांनी विजय मिळवला आहे. मुंबईची खराब फलंदाजी पराभवास कारणीभूत ठरली आहे. 20 षटकाध्ये मुंबईला फक्त 131 धावा करता आल्या. पंजाबच्या के. राहुलने दमदार अर्धशतक मारत संघाला विजय मिळवून दिला.

नाणेफेक जिकंत के. एल राहुलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मुंबईची सुरूवात मात्र निराशाजनक झाली. डिकॉक हुड्डाच्या गोलंदाजीवर बाद झाला.  ईशान किशन मैदानात आला. मात्र, मुंबईने पॉवरप्लेनंतर ईशान किशनला गमावले. त्यानंतर सुर्यकुमारने ताबडतोड फलंदाजी केली मात्र मोठी भागीदारी बनवण्यात तो अपयशी ठरला. रोहित शर्माने एक बाजु लावून धरत मुंबईचा डाव सावरला. रोहित शर्माने 52 चेंडूत  63 धावा केल्या.

अखेरच्या चार षटकात मुंबईने आपले गडी गमावले आणि कमी धावसंख्येत आपला डाव आटोपला. मात्र या लहानशा लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने सावध सुरूवात केली. राहुल आणि मयंकने 53 धावांची सलामा दिली. त्यानंतर मुंबईचा फिरकीपटू राहुलने मयंकला बाद केलं. मात्र त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांना गडी बाद करता आले नाहीत.ख्रिस गेल आणि केएल राहुल यांनी 79 धावाची अभेद्द भागीदारी रचत हा विजय साकारला. राहुलने नाबाद 60 तर गेलने नाबाद 43 धावांचे योगदान दिले.

दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईने पहिल्या 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा लाजिरवाणा विक्रम केला आहे. मुंबईने पॉवरप्लेमध्ये 1 बाद 21 धावा केल्या.

थोडक्यात बातम्या- 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली विजय वल्लभ हॉस्पिटलला भेट; केंद्र सरकारवर निशाणा साधत म्हणाले…

चोरालाही फुटला पाझर; सॉरी म्हणत चुकून चोरलेल्या कोरोना लसी केल्या परत

“केंद्राला 150 रूपये आणि राज्याला 400 रूपये दरात लस देण्याचा निर्णय अन्यायकारक”

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

चांगली बातमी! महाराष्ट्रासाठी 1661 मेट्रिक टन ऑक्सिजन उचलण्यास केंद्राची मंजुरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More