नवी दिल्ली | कोरोनाने आधी थैमान घातलेलं होत मात्र आता कुठे कोरोना आटोक्यात आला नाही तर आंध्र प्रदेशमध्ये आणखी एका रहस्यमय आजाराची लाट आली आहे. गेल्या शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 500 लोकांना लागण या रहस्यमय आजाराची लागण झाली.
या आजाराचं लक्षण म्हणजे जितक्या लोकांना हा आजारा झाला त्यांना आकडी आली आणि त्यानंतर ते बेशुद्ध पडले. मात्र काही वेळाने लवकर बरे होत आहेत. मात्र नक्की कशामुळे हा आजार होत आहे याबाबत कोणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
आत्तापर्यंत या आजाराची 510 जणांना लागण झाली होती यामधील 430 लोकांना घरी सोडण्यात आलं आहे. यामध्ये मात्र एकाचा मृत्यु झाला असल्याची माहिती आंध्र प्रदेशचे आरोग्यमंत्री ए. के. कृष्णा श्रीनिवास यांनी दिली.
दरम्यान, ज्यांना हा आजार झाला होता त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. यामध्ये त्यांच्या रक्तातशिसे (लेड) आणि निकेल आढळून आलं आहे. सध्या या आजाराचं मूळ कारण शोधण्याचं काम चालू आहे.
थोडक्यात बातम्या-
‘राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथी मधला फरक तरी माहित आहे का?’; मुख्यमंत्र्यांची टीका
कोथरुडच्या सोसायटीत शिरला गवा; गवगवा झाल्यावर पुणेकरांची तोबा गर्दी!
धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीची हॉटेलच्या रूममध्ये आत्महत्या
“…फुसकुली सोडून भाजपने स्वतःचीच अक्कल दिवाळखोरी जाहीर केली
मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई; रिया-सुशांत प्रकरणाशी संबधीत ड्रग पेडलरला अटक