बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेस नेते राहुल गांधीच पंतप्रधान होणार आहेत”

अमरावती | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कितीही रणनीती आखली तरी आताही मोदीच आहेत आणि 2024 लाही मोदीच राहतील, अशा शब्दात राष्ट्रवादीवर टीकेचे बाण सोडले.

दरम्यान, या प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “प्रशांत किशोर यांनी दोन वेळा सांगितलय की, राहुल गांधी पंतप्रधान होणार”, असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावतीमध्ये व्यक्त केलं आहे. प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीकडून कोणत्याही प्रकारची जबाबदारी अद्यापपर्यंत किशोर यांना देण्यात आलेली नाही. पण राजकीय वर्तुळात मात्र अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे.

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर देशामध्ये यूपीए सरकार स्थापन होईल आणि त्याचे नेतृत्व शरद पवार करतील, अशा चर्चा सुरू आहेत. असं असेल तरीही काँग्रेस पक्ष हा यूपीएचा आत्मा आहे आणि त्यामुळेच काँग्रेस पक्षाचाच पंतप्रधान होईल, असं दोनदा प्रशांत किशोर यांनीच सांगितलं आहे, असं नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.

“सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात दोन वेळा सरकार स्थापन झालेलं आहे आणि ते यशस्वीरीत्या चाललेलं देखील आहे. त्यामुळे आम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही”, असं नाना पटोले यांनी बोलताना म्हटले आहे.

थोडक्यात बातम्या –

‘…तर ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल’; पवारांच्या निवडणूक एकत्र लढण्याच्या वक्तव्यावर पटोलेंचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 24 तासात फक्त 2 जणांचा मृत्यू, तर नव्या 15 बाधितांची नोंद

ब्लॅक फंगसच्या औषधावर आणि कोरोना लसीवर GST लागणार का? अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

“सोनिया गांधींची गुलामगिरी करत सत्तेचं लोणी खाणं बरं वाटतं का?”

“काँग्रेस नेते राहुल गांधीच पंतप्रधान होणार आहेत”

 

 

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More