Top News महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईकरांना कोरोना लस मोफत मिळायला हवी- गणेश नाईक

Photo Credit- Facebook / Ganesh Naik & Uddhav Thackeray

मुंबई | सध्या राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे राज्याता लसीची मागणी नागरिक करू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गणेश नाईक यांनी कोरोना लस मोफत मिळण्याची मागणी केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि अशातच भाजपने केलेली मोफत लसीच्या मागणीवरून अनेक तर्क वितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत.

जर केंद्र सरकारने ही लस सर्वसामान्यांना मोफत उपलब्ध करुन दिली नाही तर नवी मुंबईतील सुमारे 15 लाख नागरिकांना महापालिकेने लस मोफत उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी बजेटमध्ये 150 कोटींची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी पालिकाआयुक्तांकडे केली असल्याचं गणेश नाईक यांनी सांगितलं. क्रिस्टल हाऊस येथे आज शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.

नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबई भाजप निवडणूक प्रभारी आणि आमदार आशिष शेलार आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.  यावेळी आशिष शेलारांनीही सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या पराभवाची सुरूवात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासून होईल. तर गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे शहर देशातील एक नंबरचं स्वच्छ शहर झालं आहे. या स्वच्छ शहराला आता भाजपला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करायचं असल्याचं आशिष शेलार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘मंत्रिपद हे फक्त नाचण्यासाठी नसतं तर…’; हर्षवर्धन पाटलांचा दत्तात्रय भरणेंना टोला

उद्धवजींचं सरकार ना रामाचं…ना भिमाचं…नाही काही कामाचं- रामदास आठवले

धक्कादायक! थुंकी लावून लोकांना वाढायचा, समोर आला किळसवाणा प्रकार, पाहा व्हिडीओ

“मोदी साहेब ‘मन की बात’मधून चांगलं बोलतात परंतु कृती काहीच करत नाही”

‘या’ भाजप नेत्याला ड्रग्ज घेण्याची सवय, कोलकाता पोलिसांचा खळबळजनक दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या