Top News देश

‘ज्या चेहऱ्यावर तू घमंड करते त्यावर अ‌ॅसिड टाकून…’; शिवसेनेच्या लेटरहेडवरून धमकी आल्याचा नवनीत राणांचा आरोप

मुंबई | शिवसेनेच्या लेटरहेडवरून अ‌ॅसिड हल्ल्याची धमकी आली असल्याचा दावा अमरावती खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. 8 फेब्रुवारीला संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर नवनीत राणा यांनी भाषण करताना महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर टीका केली होती. यावरून त्यांना धमकी आली असल्याचं राणा म्हणाल्या.

लोकसभेत केलेल्या भाषणात नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर टोलेबाजी केली होती. याच भाषणाच्या आधारे हे पत्र आलेलं आहे. शिवसेनेच्या लेटरहेडवर हे पत्र आलेलं आहे. मात्र त्या लेटरहेडवर कोणताही पत्ता नसून केवळ शिवसेनेचं चिन्ह आहे.

ज्या चेहऱ्यावर तु घमंड करते त्या चेहऱ्यावर अ‌ॅसिड टाकून तुला कुठे फिरण्याइतकं ठेवणार नाही, अशी धमकी आल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच तुझा पती आमदार रवी राणा त्याला सुद्धा याला आम्ही इतर लोकांसोबत जे केलं आहे तशाप्रकारे राणासोबत करू, त्यामुळे उद्धव ठाकरेंवर जर काही बोलले तुला फिरण्यासारखं ठेवणार नसल्याची धमकी राणा यांना आली आहे.

दरम्यान, अ‌ॅसिड हल्ल्याची धमकी देणाऱ्या पत्रासंदर्भात दिल्लीतील पोलीस स्थानकात नवनीत राणा यांनी तक्रार दाखल केली आहे. तर त्यासोबतच त्यांनी याबाबत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडेही त्यांनी तक्रार केली आहे. यावर शिवसेनेकडून अद्यापही प्रतिक्रिया आलेली नाही.

थोडक्यात बातम्या-

“एखाद्या हत्येची आत्महत्या करण्यात हे सरकार माहीर आहे”

भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल- उद्धव ठाकरे

लग्नाआधीच्या प्रेयसीसोबतची ऑडिओ क्लीप पत्नीने ऐकली अन् मग….

या लोकांना महिलांवर अत्याचार करायला सरकारने लायसन्स दिलंय काय?- नारायण राणे

“देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे आता जोडीने मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहत बसतील”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या