मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेेला मोदी सरकारचा 2020चा अर्थसंकल्प हा साप शिडीच्या खेळाप्रमाणे असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
देशातील सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येेत नाय्ये की ते कधी वरती जात आहेत. तर कधी खाली येत आहेत, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
केंद्र सरकारने सादर केेलेल्या अर्थसंकल्पावर सर्व विरोधी पक्षांनी टीका केली आहे. हा अर्थसंकल्प अत्यंत गुंतागुंतीचा आहे. या अर्थसंकल्पनेनं कररचनेला आणखी क्लिष्ट केलं असल्याचं अर्थतज्ञांचं म्हणणं आहे.
दरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचं योगदान सर्वात जास्त आहे. मात्र तरीही केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्र गायब असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे.
वित्त मंत्री @nsitharaman द्वारा पेश किया गया मोदी सरकार का #Budget2020 ‘सांप सीढ़ी’ के खेल समान है, देश की जनता को पता नहीं चल रहा की वे कब ऊपर जा रहे है या नीचे आ रहे है.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) February 2, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“राज्य सरकार बदललं की, आधीच्या सरकारच्या चौकशीचं राजकारण सुरु होतं”
“SC आणि OBC बजेट एकत्र सादर करून केंद्र सरकारने भांडण लावण्याचं काम केलं”
महत्वाच्या बातम्या-
अडीच वर्षाच्या चिमुकलीची अनोखा पराक्रम; प्रबळगड कलावंतीणीचा सुळका केला सर!
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ‘इतका’ निधी मिळणं आवश्यक होतं- अजित पवार
राहुल गांधींच्या ‘त्या’ टीकेवरुन स्मृती इराणींनी केला ‘हा’ थेट सवाल
Comments are closed.