Top News महाराष्ट्र मुंबई

“शिवजयंती धूमधडाक्यातच झाली पाहिजे, कुठलं सरकार आम्हाला थांबवू शकत नाही”

मुंबई | अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महारांजांची जयंती काही दिवसांवर आली आहे. मात्र राज्य सरकारने यंदाच्या वर्षी शिवजयंती साजरी करताना नियमावली जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

यंदाची शिवजंयती ही 100 लोकांच्या उपस्थितीतच साजरी करावी, अशा प्रकारचे निर्बंध सरकारने लावले आहेत. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी सरकारवर टीका केली असून शिवजयंती धूमधडाक्यात साजरी झाली पाहिजे असं म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या पदग्रहण सोहळ्याला गर्दी खचाखच भरली होती. प्रत्येक BEST बस मध्ये 50 च्या जागी 70 भरले जातात ते ह्या सरकारला चालतं मग शिवजयंती साजरी करायला कडक निकष का?, असा सवाल निलेश राणेंनी केला आहे. त्यासोबतच शिवजयंती धूमधडाक्यातच झाली पाहिजे आणि ती होणारच, कुठलं सरकार आम्हाला थांबऊ शकत नसल्याचं म्हणत राणेंनी सरकारला इशारा दिला आहे.

दरम्यान, आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाहीतर काय टिपू सुलतानची साजरी करणार का?, आजान स्पर्धा भरवता, बारची वेळ सारखी वाढवून देता, विविध निवडणुकीत कोरोना नियमाची पायमल्ली करता मग, शिवजयंतीला नियमावली का?, असं म्हणत मनसे नेते बाळ नामंदगावकर यांनीही सरकारवर निशाणा साधला.

 

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

आरजे राघव… पोराच्या एका व्हिडीओनं आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलंय!

“दाढी वाढवून स्वत:ची शिवरायांशी तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना राजधर्म कळणार नाही”

“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरी बाणा दाखवणार का?”

“महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय?”

शिवसेनेने केंद्राकडे केली ‘ही’ मागणी; ठाकरे सरकार विरूद्ध राज्यपाल वाद विकोपाला जाणार?;

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या