बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार रात्रीच्या पार्टीमध्ये नाही”

मुंबई | गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामध्ये MPSC च्या उमेदवारांनासुद्धा याचा फटका बसला होता. मात्र अशातच पुन्हा एकदा एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे एमपीएससी देणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. यावरून भाजप नेते नितेश राणेंनी राज्य सरकावर टीका केली आहे.

एमपीएससीच्या परीक्षा परत पुढे ढकलल्या आहेत. परीक्षेला बसणाऱ्या मुलांचे वय वाढत चाललं आहे. मुलांचे वय कसं कमी करणार?, यांची मुलं परीक्षेला बसली नाही म्हणून वाटेल ते निर्णय घेत आहेत. फक्त एमपीएससी परीक्षेमध्येच कोरोना होणार रात्रीच्या पार्टीमध्ये नाही?, असं म्हणत नितेश राणेंनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत. नवी पेठेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी रास्तारोको सुरू केला आहे. रस्त्यावर उतरले आहेत. नवी पेठेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी रास्तारोको सुरू केला आहे.

दरम्यान, पुण्यातील अलका चौकातून सिंहगड रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला होत पण पोलिसांनी एका बाजूची वाहतूक सुरू केली. मात्र दुसऱ्या बाजूला विद्यार्थी मोठ्या संख्येने गोळा होऊन एमपीएससीच्याया निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान असणार- कंगणा राणावत

मुंबईची पहिली माफिया क्वीन गंगुबाईची जाणून घ्या खरी कहाणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘या’ ठिकाणी घेतली कोरोनाची लस

मोठी बातमी! कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ शहरात लॉकडाऊनची घोषणा

तारीख पे तारीख… एमपीएससीच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More