Top News देश

“ओवैसीला विकत घेऊ शकेल असा अजुन कोणी जन्माला आलेला नाही”

नवी दिल्ली | भाजप एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमला बंगालमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी प्रचार रॅलीवेळी बोलत होत्या. यावर ओवैसी त्यांना उत्तर दिलं आहे.

आजपर्यंत असा कुणी जन्माला आलेला नाही की जो पैशांनी औवेसीला विकत घेऊ शकेल. ममता बॅनर्जी यांचे आरोप निराधार असल्याचं ओवैसींनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.

अल्पसंख्यांकांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपने हैदराबादच्या एक पार्टीला पकडलं आहे. भाजप त्यांना पैसै देत असून ते मत विभाजन करण्याचं काम करत असल्याचं बिहार निवडणुकीत सिद्ध झालं असल्याचं ममता बॅमर्जी यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, ममता बॅनर्जी अस्वस्थ असून त्यांनी आपल्या पक्षाची आणि घराची काळजी घेतली पाहिजे. कारण ममता यांच्या पक्षातील अनेक लोक भाजपमध्ये गेले असून त्यांनी बिहारच्या मतदारांचा आणि आमच्यासाठी मतदान करणाऱ्यांचा अपमान केला असल्याचं औवेसी यांनी म्हटलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

“लोकसभा निवडणूक एकहाती जिंकूच, पण विधानसभेतही आमचा विजय निश्चित”

कोरोनाचं पहिलं लसीकरण ‘या’ राज्यात होणार सुरु; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

“टू मच डेमोक्रॉसी”, म्हणत उर्मिला मातोंडकरांची मोदी सरकारवर जोरदार टीका

राज्य सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या फारच जिव्हारी लागलाय- अजित पवार

हे पाकिस्तान नाही, हा महाराष्ट्र आहे इथं कायद्याचं राज्य- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या