बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तरच पगार मिळणार”

पाटणा | देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. यामुळे लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मात्र काही लोकांना या लसीवर विश्वास नसून ते लस घेण्यास नकार देत आहेत. याच पार्श्वभूमीवर बिहारच्या गया जिल्ह्यात एका अधिकाऱ्याच्या पत्राची जोरदार चर्चा रंगली आहे.

गयाचे जिल्हाधिकारी अभिषेक सिंह यांनी 20 एप्रिलला एक पत्र जारी केलं आहे. मार्च महिन्याचा पगार हवा असल्यास लसीचे दोन्ही डोस घेतल्याची प्रमाणपत्रं सादर करावी लागतील, याची माहिती आधीच देण्यात आली होती. ही प्रमाणपत्रं जमा केल्यानंतरच सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळेल याबद्दल पूर्वसूचना देखील देण्यात आली होती, असं सिंह यांनी पत्रात लिहिलं आहे.

सिंह यांनी पत्रात लिहिल्याप्रमाणे काही कर्मचारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरच पगार घेत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. यामुळे आदेशाचं उल्लंघन होत आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी लसींचे दोन्ही डोस घेतल्याची प्रमाणपत्रं द्यावीत आणि त्यानंतरच त्यांना वेतन दिलं जाईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

दरम्यान, बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात दररोज 12 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. याशिवाय मृत्यूदरातही वाढ झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

मेकअप खराब होईल म्हणून मास्क न लावणं नवरीला पडलं चांगलंच महागात!

“भाजपमधील राजकीय शुक्राचार्यांनी महाराष्ट्रातील लोकांच्या जीवाशी खेळू नये”

अखेर ती फेसबुक पोस्ट ठरली खरी; मुंबईतील महिला डॉक्टरचं कोरोनाने निधन

भारतात ट्रिपल म्युटंट कोरोनाचा शिरकाव; समोर आली ही धक्कादायक माहिती

“18 वर्षापुढील सर्वांसाठी मुख्यमंत्र्यांनी मोफत लसीकरणाचा कार्यक्रम जाहीर करावा”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More