मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेला दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश दिले आहेत. सध्या कोरोनाची आकडेवारीही वाढताना दिसत आहे. आजची आकडेवारीही धक्कादायक आहे.
राज्यात आज 13659 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज नवीन 9913 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 20,99,207 रुग्णांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आलं आहेत. राज्यात एकूण 99,008 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आता 93.21% झालं आहे. त्यासोबत पुणे जिल्ह्यातीलही आकडेवारी वाढत्या आलेखाप्रमाणे आहे.
पुण्यात सध्या 364 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,11,521 इतकी आहे. तर पुण्यात 7719 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4910 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 1,98,892 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 7721 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनमध्ये आठवड्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात अशा प्रकारचं अंशत: लॉकडाऊन राहणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय घोषित केला आहे.
राज्यात आज 13659 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 9913 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2099207 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 99008 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.21% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 10, 2021
थोडक्यात बातम्या –
‘…म्हणून वाझेंना पोलिस दलात घेण्यात आलं’; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; पायाला झालीय गंभीर दुखापत
पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक
‘सचिन वाझे जणू ओसामा बीन लादेन…’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
जागतिक अंतिम कसोटी सामना ‘लाॅर्डस’ नव्हे तर ‘या’ ठिकाणी होणार
Comments are closed.