बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डुकराचा बड्डे! या चिमुकलीची कल्पनाशक्ती पाहून सोशल मीडियावर सारेच हैराण, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर कायम वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कलाकारांचे, रिक्षाचालकांचे, सामान्य लोकांचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात तर कधी प्राणी पक्ष्यांने दाखवलेली हुशारी, तर कधी लहान मुलांच्या कलाकारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक चिमुरडी तिचं कल्पना विश्व रंगवतांना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमधील चिमुकलीचं नाव वसू आहे. ती तिच्या वडिलांना डुकराच्या वाढदिवसाचा बेत सांगत आहे. ती म्हणते, ‘मी आज डुकराच्या बर्थडेला जाणार आहे. त्याने मला फोन करून बोलावलं आहे. माझ्यासोबतच वाघ, सिंह, कोल्हा, मुंग्या, लांडगा, हत्ती, फुलपाखरं, मधमाशा, डोरिमाॅन, चिमण्या, स्माईली, टेडी आणि पांडा हे सगळे येणार आहे. आम्ही त्याचा बर्थडे पुण्यात ब्रीजच्याखाली करणार आहे. तिथे 3 करोड कोबंड्यांसोबत आम्ही केक कापणार आहे’. एवढच नाही तर आता सगळ्यांचा बर्थडे तिथेच होणार असल्याचंही तिने सांगितलं आहे.

वसूचे वडील तिला उत्सूकतेने विचारतात,’मग डुकराच्या बर्थडेला केक कोण आणणार आहे’? तेव्हा तिचं उत्तर ऐकून आपसूकच आपल्या चेहऱ्यावर हसू उमटत. ती म्हणते हरिण आणि मधमाशा त्याच्यासाठी केक आणणार आहे. त्यावर हॅपी बर्थडे डुक्कर असं लिहिलं आहे. तिचे वडिल विचारतात, पुणे फार दूर आहे इतक्या लांब कसं जाणार तर ती म्हणते ससा त्याची गाडी आणणार आहे. डुकराचा बर्थडे झाल्यावर त्यांचा पुण्याहून थेट विरारला डुकराचा मित्र पांडाकडे जाण्याचा प्लॅन असल्याचंही तिने म्हटलं आहे.

दरम्यान, किरण क्षीरसागर वसूचे वडिल यांनी या चिमुकलीच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी या 4 मिनिटाच्या व्हिडीओला ‘डुकराचा बर्थडे’ अस शीर्षक देऊन फेसबुकवर शेअर केला आहे. आतापर्यंत 78 हजारांहून जास्त लोकांनी हा बापलेकीचा गमतीदार संवाद व्हिडीओद्वारे पाहिला आहे.

 

 

थोडक्यात बातम्या

‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे आजचा भाव…

13 महिन्यांच्या तुरुंगवासादरम्यान कैद्याने केलं ‘हे’ कौतुकास्पद काम!

इंधन दरवाढीवरून रोहीत पवारांनी मोदींना दिला ‘हा’ सल्ला

“…हे बेणं म्हणजे 2029 चा आमदारच म्हणा ना”

धक्कादायक! मुंबईच्या रस्त्यावर कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण फिरतांना आढळले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More