Top News खेळ

कांगारूंचा पराभव केल्याने पंतप्रधान मोदींचीही भारतीय संघावर कौतुकाची थाप; म्हणाले..

मुंबई | भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या मायभूमीत त्यांचाच पराभव करून इतिहास रचला आहे. भारतीय संघाच्या या धडाकेबाज कामगिरीच देशभरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भारतीय कसोटी संघाचं कौतुक केलं आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या यशाने आम्ही सर्वजण आनंदी आहोत. त्यांची उल्लेखनीय उर्जा आणि उत्कंठा सर्वत्र दिसून आली. त्यांचा उत्कृष्ट, उल्लेखनीय धैर्य आणि दृढ संकल्प दिसून आली असल्याचं मोदींनी  मोदींनी म्हटलं आहे. सोबतच शरद पवार आणि मुख्यमंत्री यांनीही संघाचं कौतुक केलं आहे.

गाबाच्या मैदानावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं आहे.

दरम्यान, गाबाच्या मैदानावर सलग 28 कसोटी कसोटी सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रलियाच्या विजयी रथाला भारताने रोखलं आहे. भारतीय युवा गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी आणि फलंदाजांनी केलेल्या धाडसी खेळामुळे भारताचा विजय निश्चित झाला. या विजयामुळे भारतीय संघाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘गाबा’चा घमंड उतरवलाच! भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत जिंकली मालिका

‘टीम इंडिया’च्या विजयावर शरद पवारांचं ट्विट, म्हणाले…

‘घ्या निवडणुका, महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तर…’; भाजपचं शिवसेनेला ओपन चॅलेंज

पाकिस्तानला हवी भारतीय लस; पुण्यातील सीरमच्या लसीसाठी प्रयत्न सुरु!

उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या