बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

न्यूज इंडस्ट्रीला मोठा धक्का! रोहित सरदाना यांच्यानंतर लोकप्रिय महिला ॲंकरचं निधन

नवी दिल्ली | आज तक या वृत्तवाहिनीचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांच्या दु:खद निधनानंतर आणखी एका लोकप्रिय महिला ॲंकरचं निधन झालं आहे. दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर कनुप्रिया यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. दोन दिवसात मीडिया क्षेत्रातील मोठ्या वृत्तनिवेदकांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

कनुप्रिया यांना दोन दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होता. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली होती. मला तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची गरज असल्याचं कनुप्रिया यांनी म्हटलं होतं. परंतू त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची लेवल ही मोठ्या प्रमाणात कमी झाली होती आणि त्यांचा तापही वाढत होता. यादरम्यान त्यांचं निधन झालं.

कनुप्रिया हा माध्यमांचा एक मोठा चेहरा होता. त्यांनी दूरदर्शनपासून अँकर म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. यानंतर त्यांनी आपल्या नंतरच्या कारकीर्दीत अभिनय आणि नाट्यक्षेत्रातील कौशल्य दाखवलं. ती एक चांगली पटकथा लेखकही होती.

दरम्यान, आज तक या वृत्तवाहिनीचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं काल निधन झालं होतं. आता कनुप्रिया यांचं निधन त्यामुळे मीडिया क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल माध्यमांवर आपला शोक व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

न्यूज इंडस्ट्रीला मोठा धक्का! रोहित सरदाना यांच्यानंतर लोकप्रिय महिला ॲंकरचं निधन

बिहारचा बाहुबली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद शहाबुद्दीनचं कोरोनाने निधन

लेक असावी तर अशी!, भारतीय संघातील ‘या’ खेळाडूच्या प्रेयसीकडून वडिलांना यकृत दान

मराठी पाऊल पडते पुढे… आदिवासी तरुणाच्या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक

धक्कादायक! तरुणीचा पाठलाग करुन भररसत्यात फाडले तिचे कपडे अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More