पुणे महाराष्ट्र

शरद पवारांनी ‘त्या’ प्रकरणातील बनावट कागदपत्रं सार्वजनिक करावीत- प्रकाश आंबेडकर

पुणे | एल्गार परिषदेचे प्रकरण हे बनावट आहे. या प्रकरणातील संबंधित कागदपत्रे बनावट असून तयार करण्यात आली आहे, असं पत्र शरद पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. यावर वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना एक विनंती केली आहे.

एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत. केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करावा. त्याचबरोबर केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबतोय, हे या कागदपत्रांवरून उघडकीस येईल, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

एल्गार परिषदेच्या निमित्ताने केंद्राने राजकारण केले असून या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. नको असलेले कायदे या ठिकाणी लावण्यात आले. या प्रकरणातील खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचं पवारांना माहित झालं आहे तर त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक करावी, अशी विनंती प्रकाश आंबोडकरांनी केली आहे.

दरम्यान, केंद्रात आरएसएस, बीजेपीचे सरकार आल्यानंतर त्यांनी एल्गार परिषदेला बदनाम केलं. एल्गार परिषदेच्या निमित्ताने केंद्राने राजकारण केलं असून या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने करण्यात आला असल्याचं आंबेडकरांनी म्हटल आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुण्याजवळील ‘या’ भागात होणार उद्यापासून लॉकडाऊन

“आज बाळासाहेब असते तर ही घटना घडलीच नसती”

उदयनराजेंनी पहिल्यांदाच मोदी सरकारच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत दिला हा सल्ला

“आरोग्याची हमी मिळत नसेल तर कोणीही जीव धोक्यात घालणार नाही…”

“कोरोना तर काहीच नाही अजून 2 मोठी संकटं येणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या