बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

असे निकाल 15 दिवसात लागले पाहिजेत- प्रणिती शिंदे

नवी दिल्ली | दिल्ली निर्भया बलात्कार प्रकणावरुन संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पटियाला हाऊस न्यायालयाने डेथ वॉरंट जारी केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

निर्भया प्रकरणासारख्या घटनांचे निकाल 15 दिवसांत लागले पाहिजेत, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत. त्या एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

न्यायालयाने दिलेल्या निकालाचं स्वागत करते. हा निकाल दिल्यानंतर तरी अशा घटना थांबव्यात. जोपर्यंत मानसिकतेत बदल होत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत. जोपर्यंत गुन्हे पोलिसांपर्यंत पोहचत नाहीत, यंत्रणेकडून महिलांना मदत मिळत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

15 दिवसात असे निकाल लागले पाहिजेत त्यासाठी काही कायदे आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. सत्ताधाऱ्यांचाच यासाठी विरोध होतो त्यामुळे ते पारित होत नाहीत. राजकारणाच्या पलिकडे जाऊन सर्वांनी यात साथ दिली पाहिजे आणि  असे बील एकमुखाने कायदे केले पाहिजेत, असंही त्या म्हणाल्या आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

निर्भयाच्या आरोपींना डेथ वॉरंट; 22 जानेवारीला फाशी

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर आधारीत फोटो आणि व्हिडिओग्राफी स्पर्धा

जेएनयू प्रकरण; आईशी घोषसह 19 जणांवर एफआयआर दाखल

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More