बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवणारच; राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या जीआरवर दरेकर यांची टीका

मुंबई | विधानसभा आणि विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी बोलावलेल्या बैठकीला शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये. त्यासोबतच विरोधी पक्षनेत्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेता येणार नाही, असा जीआर राज्य सरकारकडून काढण्यात आला आहे. दरम्यान राज्य सरकारने काढलेल्या जीआरवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी टीका केली आहे.

विरोधी पक्षनेत्यांनी कुठे जाऊ नये आणि माहिती घेऊ नये, असा केविलवाणा प्रयत्न राज्य सरकारने या शासन निर्णयाच्या माध्यमातून केला आहे. पण कोबडं झाकलं तरी सुर्य उगवायचा राहत नाही, अशी बोचरी टीका राज्य सरकारवर प्रविण दरेकर यांनी केली आहे.

राज्य सरकारने आणि सरकारमधील पालकमंत्र्यांनी योग्य नियोजनाची, बैठकीची आवश्यकता होती. पण फक्त कोरोनाला घाबरुन अशा प्रकारचे नियोजन केलं नसल्याचं  दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी राज्यातील विविध शहरांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या दौऱ्यांदरम्यान फडणवीस आणि दरेकर यांनी अधिकाऱ्यांच्यासोबत बैठका घेऊन माहिती घेतली. मात्र राज्य सरकारच्या नव्या आदेशात अधिकाऱ्यांच्या बैठकांवर बंधनं घालण्यात आली आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोलेंना कोरोनाची लागण

ही वेळ एकमेकांना मदत करण्याची आहे, कुणी गैरफायदा घेत असेल तर खपवून घेणार नाही- एकनाथ शिंद

अखेर ठरलं! ‘या’ देशात होणार आयपीएलचा 13वा सीजन

चिंताजनक! कोरोना होऊन बराही झाला, मुंबईकरांना थांगपत्ताच नाही

काँग्रेस जेवढी मागे जाईल, तेवढाच देश पुढे जाईल- बबिता फोगट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More