बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशाचे पंतप्रधानच ओबीसी आहेत, याहून मोठा सन्मान काय असेल- भाजप

मुंबई | ओबीसी आरक्षणावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद पेटलेला दिसत आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला होता. या टीकेल प्रत्युत्तर देताना विधान परिषदेचे पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राऊतांना प्रत्युत्तर देताना देशाचे राष्ट्रपतीसुद्धा ओबीसी असल्याचं म्हटलं आहे.

भाजपने ओबीसी नेत्यांना डावललं असा आरोप केला जात आहे. पण फडणवीस सरकार सत्तेत होतं तेव्हा एकनाथ खडसे यांच्याकडे दहा खाती दिली होती तर पंकजा मुंडे यांना महत्वाचं ग्रामीण विकास खातं दिलं होतं. आज ही त्या राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करत आहेत. एवढंच नाहीतर आज देशाचे पंतप्रधानच ओबीसी आहे याहून मोठा सन्मान काय असेल, असंही दरेकर म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकावरही टीका केली.

महाविकास आघाडी सरकारमुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. या सरकारने त्यांचा अवमान केला आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची नाराजी समोर आली आहे, असंही दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मी विरोधी पक्षनेता होतो आणि ओबीसींचं नेतृत्व करतो. त्यामुळे मला वाटलं महसूल खातं मिळेल पण हे खातं भेटलं कारण मी ओबीसी आहे ना, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. ओबीसींचं नेते बावनकुळे यांच्या आमदारकीचे तिकीट कापून ‘ओबीसी’ नेतृत्वाचे पंख कापणारे हात कोणाचे होते, हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळूद्या, असा सवाल संजय राऊतांनी अग्रलेखातून केला आहेेेेेेे.

थोडक्यात बातम्या- 

“…तर मी स्वत: अजितदादांविरोधात तक्रार करेल”

निशाने करण मेहराच्या परिवारावर केला गुन्हा दाखल, धक्कादायक कारण आलं समोर

“राज्य सरकार कोरोनाची दहशत पसरवत जनतेला वेठीस धरून सामाजिक आणीबाणी लादत आहे”

‘विश्वामित्रने ब्रम्हचर्य भंग करून मेनकेशी लग्न केलं हा तसाच प्रकार’; नाथाभाऊंचं फडणवीसांवर टीकास्त्र

मोठी बातमी! कोरोनाबाधित क्षेत्रासाठी 1.1 लाख रुपयांचा निधी; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More