Top News महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले….

मुंबई | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य ऐकून आता मला लाज वाटायला लागली आहे. कारण एकेकाळी मीदेखील विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दरेकरांवर टीका केली होती. पवरांच्या या टीकेला दरेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची पवार साहेबांनी दखल घेणं हे माझं स्वतःचं भाग्य समजतो. वर्षभर महाराष्ट्र अडचणीत असताना राज्य सरकार राजकारण करत होतं.  मात्र त्याकाळात विरोधी पक्षनेता म्हणून विधायक दृष्टीने मी काम केलं असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

वस्तूस्थिती मांडणं हा काय दोष आहे का?, शेतकरी मोर्चात भेंडी बाजारमधील भगिनी कशा? हे केवळ एक उदाहरण म्हणून मी सांगितलं. मी आधार असलेलं वक्तव्य केलेलं आहे कोणाच्या सांगण्यावरून बोललो नाही, असंही दरेकर म्हणाले.

दरम्यान, दिल्लीतील शेतकरी आंजोलनाच्या समर्थनार्थ आझाद मैदानावरील आंदोलनात शेतकरी हे शेतकरी नाही तर तर लोकच जास्त घुसवली असल्याचं दरेकरांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल!

दिल्लीत शेतकऱ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?; समोर आला धक्कादायक व्हिडीओ

शीतल आमटेंचा विश्वासघात कुणी केला?; पती गौतम करजगींचे धक्कादायक आरोप

आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंग्याला धक्काही लावला नाही!

पहिले ते चौथीचे वर्ग कधी सुरु होणार?; शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या