Top News देश

शेतकरी, जवान नाही तर मोदी सरकारसाठी तीन चार उद्योगपती देव- राहुल गांधी

नवी दिल्ली | केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.

सैनिकांच्या पेन्शन कपातीच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. काही उद्योगपतींचे हित डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शनमध्ये कपात करण्यात आल्याचा आरोपही गांधींनी केला आहे.

ना शेतकरी आणि ना जवान मोदी सरकारसाठी केवळ तीन चार उद्योगपती देव असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

दरम्यान, अर्थसंकल्प म्हणजे केवळ एक टक्के लोकांच्या भल्यासाठी आहे. मोदी सरकार देशाची संपत्ती त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या हातात देत आहेत. सामान्य लोकांच्या हातात पैसा द्यायला सरकार विसरलं असल्याचंही गाधींनी म्हटलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

…घमंड ज्यादा हो तो, हस्तीयाँ डूब जाती है- संजय राऊत

साहेबाचा कुत्रा हरवला, पोलिसांनी दिवस-रात्र एक करुन शोधला!

जवान पतीला फेसबुकवर ‘आयुष्यभराचं चॅलेंज’ दिलं, मात्र नियतीला ते मान्य नव्हतं!

दिलदार पंत! उत्तराखंडामधील पीडितांना केली मोठी मदत जाहीर

“कलाकार एकेकाळी भाई लोकांच्या इशाऱ्यावर चालायचे, केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या