बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरचे विदुषकी खेळ थांबवावेत- राहुल गांधी

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसने सर्व जगभरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. आपल्या देशातही केोरोनाबाधित काही रूग्न सापडल्याने खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

भारत आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जात असताना, तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर विदुषकी खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा, असं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

आपल्या सोशल मीडिया अकाउंटबाबत गैरसमज पसरवून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा. सध्या कोरोना व्हायरस देशासाठी एक आव्हान बनलं आहे. सरकारने कोरोनाचा सामना कसा करता येईल? याकडे लक्ष द्यायला हवं, असा सल्ला राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

दरम्यान, काळजी करण्याची आवश्यकता नाही, घाबरु नका. आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून कोरोनाचा सामना करायचं आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

गुजराती किड्यांची मस्ती जिरवावीच लागेल; मनसेचा आता ‘तारक मेहता’विरोधात एल्गार

“विद्याताईंची राजकीय प्रतिमा खराब करण्यासाठी हे सर्व केलं जातंय”

महत्वाच्या बातम्या-

मोदींनी घेतलेल्या ‘त्या’ निर्णायाचं रोहित पवारांकडून कौतूक पण…

धक्कादायक! सारथी संस्थेच्या कामकाजात अनियमितता; चौकशी समितीचे ताशेरे

चोरट्यांनी चक्क भाजप नगरसेविकेलाच लुटलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More