बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल गांधींचा मोदी सरकारवर टीकेसाठी नाहीतर मदतीसाठी हात पुढे; म्हणाले…

नवी दिल्ली | मोदी सरकारवर नेहमी टीकास्त्र सोडणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी सरकारच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. राहुल गांधी यांनी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पक्षातर्फे श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. यावेळी त्यांचा केंद्रावर टीका करण्याचा हेतू नसून संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यात मदत करण्याचा आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाशी लढताना करण्यात आलेलं व्यवस्थापन चांगलं नव्हतं. यामागं अनेक कारणं होती. आम्ही ती कारण या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तिसरी लाट आल्यास नेमकं काय करावं सांगणारी ही ब्ल्यूप्रिंट आहे, असं राहुल म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, विषाणू सतत बदलत असून तिसरी लाट येणार हे स्पष्ट आहे. त्यामुळं सरकारला पुढील मार्ग सुचवावा हाच या श्वेतपत्रिकेचा हेतू आहे. आम्ही तज्ञांशी चर्चा केली असून यामध्ये लसीकरण हा मुख्य खांब आहे. त्यामुळं सरकारनं 100 टक्के लसीकरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. रुग्णांसाठी गरज असणारी औषधं, आॅक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड्स उपलब्ध आहेत का याची चौकशी करणं गरजेचं आहे.

दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी 90 टक्के लोकांचा जीव वाचवता आला असता मात्र आॅक्सिजनच्या तुटवड्यानं ते शक्य झालं नाही. सध्या देशात आॅक्सिजनचा तुटवडा नाही. पंतप्रधानांचे अश्रू लोकांचे जीव वाचवू शकत नाही पण आॅक्सिजन वाचवू शकतो. तिसऱ्या लाटेसाठी सरकारनं तयार असणं गरजेचं आहे यावर जोर देताना राहुल गांधी यांनी दुसऱ्या लाटेत झालेल्या चुका समजून घेत त्या दुरुस्त करणं, असल्याचं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“…तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी सरकारला भीती”

एक नवा हास्यास्पद प्रयोग; शरद पवारांच्या घरी होणाऱ्या बैठकीवरुन भाजपचा टोला

‘या’ दिवसापासून सुरू होणार विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन

सर्वोच्च न्यायालयाकडून नवनीत राणांना दिलासा, जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणी महत्वाचा निर्णय

“बारमध्ये गर्दी चालते, उद्घाटनाला गर्दी मग अधिवेशन का नको?, सरकार आहे की तमाशा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More