बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुम्ही मास्क घातलं नाही?; पत्रकाराच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं धक्कादायक उत्तर

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने स्वाक्षरी मोहिमेचा कार्यक्रम शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अमेय खोपकर, अवधुत गुप्ते, सायली शिंदेसहीत अनेक मराठी कलाकार उपस्थित होते.

या कार्यक्रमाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही हजेरी लावली होती. मात्र त्यांनी तोंडावर मास्क लावलेला नव्हता. स्वाक्षरी मोहिमेच्या फलकावर राज ठाकरे यांनी स्वाक्षरी केल्यानंतर पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. यावेळी एका पत्रकाराने त्यांना तुम्ही मास्क का घातला नाही, असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी त्यांच्या अनोख्या अंदाजात मी मास्क घालतच नाही, असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं.

राज यांना परवानगी नसताना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याबाबत यावेळी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी, बाकीच्या सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते, सरकारच्या कार्यक्रमाला गर्दी होते. सरकारमधील मंत्री सगळ्या कार्यक्रमांमध्ये गर्दीने येऊ शकतात आणि शिवजयंतीला, मराठी भाषा दिनाला नकार देता. करोना संकट समोर येतंय असं वाटत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

27 फेब्रुवारी हा विष्णु वामन शिरवाडकर म्हणजेच कवीवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने दरवर्षी मनसेकडून कार्यक्रम आयोजित केले जातात.

थोडक्यात बातम्या-

हरिश्चंद्रानं उद्धव ठाकरेंच्या रूपात पुनर्जन्म घेतला पण…- अतुल भातखळकर

रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या महिलेने लावला दिपीकाच्या पर्सला हात आणि त्यानंतर…,पाहा व्हिडिओ

पोलीसच निघाला चोर; माॅलमधून एकावर एक 3 शर्ट घालून पळत होता, तेवढ्यात…

खाकीतील सौंदर्य आणखीनच खुललं; PSI पल्लवी जाधव यांच्या डोक्यावर Miss Indiaचा ताज!

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री न्यायप्रिय, मिस्टर सत्यवादी, ते न्याय करणारच”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More