मुंबई | कोरोनाचं संकट भारतात आल्यापासून महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे युद्धपातळीवर काम करत असल्याचं दिसून येत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या कामाचं सर्व स्तरातून कौतूक केलं जात आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या संस्कारामुळे जबाबदारीला प्राधान्य दिल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
किल्लारी भूकंपावेळी पवार साहेबांना स्वत: पुढाकार घेऊन पुढे होऊन परिस्थितीचा सामना करताना पाहिलंय, तेच संस्कार माझ्या मनावर झाले असल्याचं टोपेंनी म्हटलं आहे.
दिवसभर वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या बैठका, आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा, पत्रकार परिषदा अशा व्यस्त वेळापत्रकामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची सध्या दमछाक होतेय. मात्र कोरोनाचं संकट परतवून लावण्यासाठी टोपे मेहनत घेत आहेत.
दरम्यान, नवीन 11 रुग्णांपैकी 8 जण परदेशातून आले होते तर तीन रुग्णांना थेट संपर्कातून कोरोनाची लागण झाली आहे. स्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय टाळावं, असं आवाहन टोपे यांनी केलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“…म्हणून मी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवणार अन् मला त्या टाळ्यांची किंमतही चांगलीच ठाऊक आहे”
“उद्धव ठाकरेंनी एक वडील म्हणून जनतेची काळजी घेतली, त्यांचं काम इतिहासात नोंदवलं जाईल”
महत्वाच्या बातम्या-
पुण्यातील सर्व पेट्रोल पंप दुपारनंतर बंद; पेट्रोल डीलर्सचा बंदला अर्धवेळ पाठिंबा
“कोरोनाबाधित नसलेल्या गाव-शहरांना सील करा”
“…तोपर्यंत विरोधी पक्षाने नाकावरचा मास्क तोंडाला बोळा म्हणून वापरावा”
Comments are closed.