बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बीएसएफ जवानाच्या बहिणीने बांधली अस्थिकलशाला बांधली राखी, फोटो पाहून तुम्हालाही येईल रडू!

जयपूर | बहिण भावाच्या नात्याचं प्रतिक असलेला रक्षाबंधनाचा सण महाराष्ट्रासह देशभरात साजरा केला जातो. लाडक्या बहिणींनी आपल्या भावाला एक प्रेमाचा धागा बांधतात. तर अनेक लोक सीमेवरील जवानांसाठी राखी पाठवत असतात. त्यातच आता एका जवानाच्या बहिणीने आपल्या भावाला अखेरची राखी बांधल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजस्थानच्या हरसौर जिल्ह्यातील नागौर येथील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. नागौर येथे राहणारे चिरंजीलाल बीएसएफमध्ये देशसेवेची कामगिरी बजावत होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. आनंदाच्या भरात घरी आल्यानंतर चिरंजीलाल यांचा ह्रद्यविकाराचा झटका आला आणि अखेर स्वातंत्र्यदिनी त्यांचा मृत्यु झाला.

चिरंजीलाल बीएसएफमध्ये हेड काॅन्स्टेबल होते. 17 ऑगस्टला त्यांच्या हरसौर या मूळगावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांच्या बहिणीने अस्थीकलशालाच राखी बांधली. राखी बांधताना बहिणीसह परिवारातील सदस्यही भावनिक झाल्याचं पहायला मिळालं.

दरम्यान, गेल्या 4 वर्षापासून चिरंजीलाल यांच्या बहिणीने राखी बांधली नव्हती. या वर्षी तो घरी आल्यानं राखी बांधणार असल्याचं बहिण आनंदात होती. मात्र तिने आपल्या भावाला अखेरची राखी आपल्या भावाच्या अस्थीकलशाला बांधावी लागली.

थोडक्यात बातम्या-

‘ही तर ठाकरे सरकारची तालिबानी मानसिकता’; तुषार भोसले कडाडले

धक्कादायक! अफगाणिस्तानमधून आलेल्या ‘इतक्या’ लोकांची कोरोना चाचणी आली पॉझिटिव्ह

इंग्लंड संघाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराहला जखमी करण्याचा प्रयत्न करणारा इंग्लिश गोलंदाज बाहेर

“मंदिरं उघडताना तिसरी लाट आडवी येते, मग दारूची दुकानं कोरोनाप्रूफ आहेत का?”

‘अजितदादा काय म्हणतात त्याला….’; अजित पवारांच्या टीकेला पडळकरांचं जोरदार प्रत्युत्तर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More