पुणे महाराष्ट्र

‘विधी’च्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचं पुनर्विलोकन करा- सुनील गव्हाणे

पुणे | विधी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे पुनर्विलोकन करावं, अशी मागणी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना 50% अंतर्गत मूल्यमापन आणि 50% मागील वर्षातील गुणांची सरासरी असं सूत्र लावत सर्व विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाकडून लावण्यात आले. मात्र विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या आणि 2014 च्या पॅटर्न प्रमाणे अभ्यासक्रम असलेल्या विद्यार्थ्यांना 100 गुणांची लेखी परीक्षा असल्या कारणाने त्यांना अंतर्गत मुल्यमापन होऊ शकत नाही. त्यामुळे विद्यापीठाने कोणते सूत्र वापरून निकाल दिले.

विद्यापीठाने दिलेल्या निकालांमध्ये जवळपास 70% विद्यार्थी अनुउत्तीर्ण करण्यात आले आहे. एकप्रकारे या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या निकालाचे पुनर्विलोकन करून या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतीत विद्यापीठाने तात्काळ निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावं, असं सुनील गव्हाणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुनील गव्हाणे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांची भेट घेतली. यावेळी याप्रकरणी विद्यापीठ पातळीवर एक समिती नियुक्त करत लवकरच निर्णय घेऊ, असं आश्वासन कुलगुरू श्री नितिन करमळकर यांनी दिलं. यावेळी विद्यापीठ अधिसभा सदस्य अभिषेक बोके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष करण कोकणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सदस्य सोमनाथ लोहार, उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

‘अचानक अभिषेक फासावर लटकल्याचा दिसला तर…’; कंगणा राणावतचं जया बच्चन यांना प्रत्युत्तर

व्यापाऱ्याला मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्या- शरद पवार

‘जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं’; जया बच्चन यांचा रवि किशन यांना अप्रत्यक्ष टोला

काळ कठीण आहे फोन बंद ठेवू नका, 3 वाजताही कुणी फोन केला तरी उचला- चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथं तसं काही होईल वाटत नाही- निलेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या