बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, ‘या’ पिकांना होणार मोठा फायदा!

नवी दिल्ली | मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत बळीराजाला दिलासा दिला आहे. खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे.

खरीप पिकांवर किमान आधारभूत किंमत परवानगी दिली आहे. खरीप पिकासाठी सरकारने हमीभावात 50 ते 62 टक्के वाढ केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तिळाच्या एमएसपी मध्ये 452 ​​रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक वाढ झाली असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तिळानंतर तूर आणि उडीदसाठी दोन्ही 300 रुपये क्विंटल सर्वाधिक एमएसपी ठरवण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा या दृष्टीने एमएसपीमध्ये सरकारने वाढ केल्याचं सांगण्यात येत आहे.

भातावरील एमएसपीमध्ये 72 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर 1868 रुपये प्रतिक्विंटल भात आता 1940 प्रतिक्विंटल झाला आहे. त्यासोबतच बाजरी प्रतिक्विंटल 2150 रुपयांवरून 2250 रुपये प्रतिक्विंटल झाली आहे. याबाबत कृषीमंत्री तोमर सिंह यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान,केंद्र सरकार गेल्या सात वर्षांपासून सातत्यानं शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असून त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी नेहमी तयार असल्याचंही तोमर सिंह म्हणाले. त्याबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बरेच निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

थोडक्यात बातम्या- 

“उद्धव ठाकरेंचं मोदींशी जमतं पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही”

‘2024 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा का?’; जयंत पाटील म्हणाले….

लहान मुलांसाठी अनोखं टेस्टींग किट; 15 मिनिटांत होणार कोरोनाचं निदान

“अमित शहांसारख्या नेत्यांमुळेच कोरोनाचा प्रसार वाढला”

तरुणाकडून माणुसकीचं दर्शन! अशा प्रकारे वाचवले पक्षाचे प्राण, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More