महाराष्ट्र मुंबई

जया बच्चन यांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…

मुंबई |  काही ठराविक लोकांमुळे संपुर्ण इंडस्ट्री बदनाम होते, असं ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी  राज्यसभेत म्हटलं होतं. त्यासोबत त्यांनी अभिनेत्री कंगणा राणावतवर निशाणा साधला होता. जया बच्चन यांच्या वक्तव्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाठींबा दर्शवला असून त्या काहीही चुकीचं बोललं नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

जया बच्चन यांनी संपूर्ण देशाची भावनाच संसदेत मांडली आहे. आज संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री गप्प आहे. लोकांनी बोलूच नये असं वातावरण तयार करण्यात आलं असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

काही ठराविक लोक इंडस्ट्रीबद्दल वाईट बोलत आहेत. फक्त इंडस्ट्रीच नाही तर आपली संस्कृती-परंपरा यांचीही बदनामी होत आहे. ते म्हणतात इथे ड्रग्स रॅकेट चालतं. हा फक्त राजकीय किंवा इतर कोणत्या क्षेत्राचा भाग नाही? हे थांबवण्याची जबाबदारी सरकार आणि लोकांचीही असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

दरम्यान, ड्रग्स तस्करी रोखणंही केंद्राचीही जबाबदारी आहे. प्रत्येकवेळी केवळ महाराष्ट्राचं नाव घेतलं जात आहे. यूपी, बिहार आणि नेपाळहून ड्रग्स येतं, असं सांगतानाच ड्रग्सबाबत जे लोक बोलत आहेत. स्पोर्ट्समध्ये होते त्याप्रमाणे त्यांची डोपिंग टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची पसंती ऑनलाईनलाच!

“सर्व खासगी रुग्णालये यापुढे सरकारनेच चालवावी”

मुंबई महापालिकेला खिसा करावा लागणार खाली?; नुकसान भरपाई म्हणून कंगणाने मागितले इतके कोटी

“हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?”

मी जाहीर करतो की आजपासून मी भाजप-आरएसएस सोबत आहे- मदन शर्मा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या