बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग, शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने छापे टाकल्यावर राजकारणातील घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्र्याचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत.

राष्ट्रवादीचे बडे नेते वर्षा बंगल्यावर दाखल झाल्यानंतर संध्याकाळी चारच्या सुमारासही दाखल झाले आहेत. शरद पवारांसोबतच राज्याचे परिवहनमंत्री अनिल परबही पोहोचले आहेत. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली?, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समजू शकलेली नाही.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर सीबीआयनंतर ईडीने छापेमारी केली. यानंतर ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीला येण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी घेण्याची विनंती केली. त्यासोबतच त्यांनी सात दिवसांची मुदत मागितली असून त्याला ईडीने परवानगी दिली आहे.

दरम्यान, ईडीने अनिल देशमुखांना अटक केली तर ठाकरे सरकारला मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली जाणार असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘भाजपमध्ये सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का?’; अनिल देशमुख प्रकरणावरून राऊतांनी सुनावले खडेबोल

खुशखबर! सोनं दोन हजारांनी तर चांदी चार हजारांनी घसरली; वाचा ताजे दर

‘आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती’; थोरातांच्या लेकीचं पडळकरांच्या टीकेला सडेतोड उत्तर

‘तारक मेहता…’मधील पोपटलाल ‘या’ रोमॅण्टिक चायनीझ चित्रपटात झळकला होता! पाहा व्हिडीओ

राज्य सरकारने केली यंदाच्या गणेशोत्सवासाठीची नियमावली जाहीर, वाचा सविस्तर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More