बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलदार गब्बर! मिशन ऑक्सिजनसाठी केलेली मदत ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल

मुंबई | कोरोनाने देशभरात हैदोस घातलेला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. एकीकडे काळाप्रमाणे आव वासून बसलेला कोरोना आहेच मात्र आता ऑक्सिजनचा तुटवडा पडू लागल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यानंतर अनेकजण पुढाकार घेत मदत करताना दिसत आहेत. अशातच भारताचा क्रिकेटपटू आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू शिखर धवनने मदत केली आहे.

आपण आता अनपेक्षित संकटात आहोत आणि या काळात एकमेकांना शक्य तेवढी मदत करण्याची जबाबदारी आपली आहे. क्रिकेटच्या मैदानावर खेळताना अनेक वर्ष तुमचं भरभरून प्रेम मला मिळालं आणि त्याचा मी ऋणी आहे. आता या देशातील लोकांना मदत करण्याची माझी वेळ आहे. मी मिशन ऑक्सिजनसाठी 20 लाखांची मदत जाहीर करत आहे. त्याशिवाय आयपीएलमधून मिळणारी बक्षीस रक्कमही मी या मोहिमेत दान करणार आहे, असं शिखर धवनने म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज असलेल्या पॅट कमिन्सने 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळपास 30 लाख रुपयांची मदत पीएम केअर फंडाला दान केले होते. तर राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज जयदेव उनाडकट यानंही त्याच्या पगारातील 10 टक्के रक्कम वैद्यकिय उपकरणांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू आता कोरोनाच्या काळात पुढे येताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट मीडिया असोसिएशननेही 2.4 लाख रुपये दान केले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

थोडक्यात बातम्या- 

ATM सेंटरमधलं CCTV फुटेज व्हायरल, ‘या’ माणसाचा कारनामा पाहून सारेच हैराण

माज यालाच म्हणतात का?, कृणाल पांड्याच्या कृतीवर सोशल मीडियात एकच चर्चा

‘माझ्याकडून पैसे घेते आणि दुसऱ्यांशी बोलते’; संतापलेल्या प्रियकराने केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शरद पवारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पेटारा उघडला, केली मोठी मदत

‘बाळांनो, आम्ही लगेच येतो’ सांगून कोरोना उपचारासाठी गेलेल्या दाम्पत्याला कोरोनाने गाठलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More