पुणे | भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक आहेत, असं शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे. पुणे मिसळ हाऊस कट्ट्यावर युवा पत्रकारांतर्फे आयोजित संवादात ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस अभ्यासू आहेत, महत्त्वाकांक्षी आहेत, मात्र त्यांचा हेकेखोरपणा आणि आततायीपणा त्यांना महागात पडला. शिवसेना आणि भाजपमध्ये त्यामुळेच दुरावा आला, असं आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.
शिरुर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावरही त्यांनी भाष्य केलं. जाती-पातीचं राजकारण आणि छत्रपती संभाजी महाराजांवरील मालिकेमुळे त्यांना फायदा झाला आणि त्यांचा विजय झाला, असंही आढळराव पाटील म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या कामकाजावर त्यांनी समाधान व्यक्त केलं. काॅंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं हे सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ट्रेंडिंग बातम्या
“ट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी उभी राहिली तर 1 कोटी लोक नक्की जमा होतील”
केवळ शिवसेनेने नाही तर काँग्रेसनेही CAA समजून घ्यावा; काँग्रेस खासदाराचा घरचा आहेर
महत्वाच्या बातम्या-
संघाच्या अंगणात जाऊन चंद्रशेखर आझाद यांचं संघप्रमुखांना ओपन चॅलेंज
कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर ‘ते’ वक्तव्य मागे घेतो- वारिस पठाण
महाविकास आघाडी म्हणजे दगडापेक्षा विट मऊ- राजू शेट्टी
Comments are closed.