Top News मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

….म्हणून कपिल शर्माने कॅमेरामनला केली शिवीगाळ, पाहा व्हिडीओ

Photo Credit - Instagram / varindertchawla

मुंबई | भारताचे प्रसिद्द काॅमिडियन कपिल शर्माला नुकतचं मुंबई विमानतळावर व्हीलचेअरवर बघण्यात आलं आहे. यावेळी कपिलला कसली तरी दुघापत झाल्याचं कळालं आहे. पण त्याला नेमकं काय झालंय याचं कारण अद्याप कळू शकलं नाही. पण विमातळावर मीडियाच्या कॅमेऱ्यांना पाहून त्याची जीभ घसरली आहे. कॅमेरामॅनला दूर राहण्यास सांगून कपिलने त्याला शिवीही दिली आहे. संबंधित कॅमेरामनने त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ बंद पडला आहे. अशातच त्याने एका कॅमेरामनला शिवी दिल्याने अजून एक वाद त्याने ओढावून घेतला आहे. या व्हिडिओमध्ये कपिलचा मॅनेजर मीडीया कॅमेरामनला त्यांची प्रकृती लक्षात घेवून संबंधित शिवीगीळ केलेला व्हिडिओ हटवण्यास सांगताना दिसत आहे. पापाराझी फोटोग्राफर वीरेंद्र चावलाने हा व्हिडीओ शेअर केला असून त्यांनी घडलेल्या सर्व प्रसगांची माहिती सांगितली आहे.

वीरेंद्र चावला यांनी हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं की, जेव्हा आम्ही कपिलचा फोटो काढण्यासाठी पुढे गेलो, तेव्हा कपिलच्या बॉडीगार्डने आम्हाला धक्काबुक्की केली. यावेळी कॅमेरामन म्हणाले की, आम्हाला कपिलशी बोलायचं आहे. त्यानंतर कपिलनेच कॅमेरामनला दूर राहायला सांगत ‘उल्लू का पट्ठा’ अशी शिवी दिली आहे. त्याचा हा शिवी दिलेला व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, अशा प्रकारची वर्तणूक करण्याची कपिल शर्माची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही त्याने ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर त्याच्या संपूर्ण टीमसोबत वाद घातला होता. त्यानंतर सुनील ग्रोव्हर, अली असगर यांच्यासह कपिलची संपूर्ण टीम त्याच्यापासून दूर गेली होती. असं असताना आता या नवीन घटनेमुळं तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

थोडक्यात बातम्या – 

गिरीश महाजन सध्या लहान आहेत त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही- नाना पटोले

ऑनलाईन मागवली कोल्डड्रिंक अन् बाटलीत निघाली…; तुम्हालाही वाचून बसेल धक्का!!!

शिवसेना नेते अनंत तरे यांचं निधन

आता फक्त माझी जबाबदारी म्हणून हात वर करता येणार नाहीत- नवनीत राणा

तुमच्या उपस्थित शिवनेरीवर मास्कची ढाल गेली कुठे?; भाजपचा उद्धव ठाकरेंना सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या