काही साप चावतात तर काही चावत नाही, त्यांना ठेचायचं असतं- उद्धव ठाकरे
जुन्नर | माझं हे शिवनेरीवर येण्याचं दुसरं वर्ष आहे. हा बहुमान जिजाऊ, शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे. महारांजापुढे नतमस्तक व्हायला शिवजंयतीच पाहिजे असं नाही. कोणतंही पवित्र काम करताना शिवाजी महाराज आठवतात. कारण शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे ऊर्जास्त्रोत आहेत. आमच्या मनात, हृदयात अखंड शिवरायांचं स्थान आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवनेरीवर येऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. यावेळी ते बोलत होते.
सध्या कोरोनासारखा दुश्मन आहे. त्यावर आपल्याला मात करायची आहे, असं सांगतानाच साप तसे अजूनही आहे. काही साप चावतात. तर काही चावत नाहीत. त्यांना ठेचायचं असतं, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर नाव न घेता टीका केली.
कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कोरोना नियमांचं पालन करुन शिवजयंतीचा आनंदोत्सव घराघरात, मनामनात साजरा होऊ दे, असं आवाहन आजित पवारांनी सर्वांना केलं आहे.
थोडक्यात बातम्या –
अजितदादांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी ‘ती’ भााषा शिकणार- उद्धव ठाकरे
गलवान खोऱ्यात ‘इतके’ सैनिक गमावले; चीनने पहिल्यांदा दिली कबुली
डाॅली की टपरी!!! सोशल मीडियावर आता या चहावाल्याचा जलवा, पाहा व्हिडीओ
प्रत्येक कोरोना रुग्णामागे 20 ते 30 जणांची तपासणी करा- राजेश टोपे
आघाडी सरकारमधील या मंत्र्याला दुसऱ्यांदा कोरोना; 4 मंत्री पाॅझिटिव्ह आढळल्याने खळबळ
Comments are closed.