बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नरेंद्र मोदींना त्यांच्या पुतण्याला उपमुख्यमंत्री करायचं नाही”

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पाडली. या बैठकीत अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. ही बैठक पार पाडल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. शरद पवार हे मोदींविरोधात भाजपविरोधात पक्षांना एकत्र घेऊन मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांसह, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुुळे यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे.

मोदींना त्यांच्या पुतण्याला उपमुख्यमंत्री करायचं नाही ना आपल्या मुलीला खासदार किंवा मोठा नेता करायचं नाही आणि आपल्या नातवालाही आमदार करायचं नाही. त्यामुळेच देश माझा परिवार या भावनेने काम करणाऱ्या नेत्याच्या समोर सगळे पक्ष एकत्र आले, इतर देशांतले मोदींचा हेवा करणारे एकत्र आले तरी जोपर्यंत जनता सोबत आहे, कुणी काही बिघडवू शकत नसल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

एकत्र येऊन मोदींना विरोध करणं अशा लोकांना कधीही जनता साथ देत नाही. अशा कोणत्याही नेत्याला यश येत नाही. त्यांना मोदींचा मुकाबला करायचा असेल, तर जिथे त्यांची सत्ता आहे, तिथे कृती करून दाखवा. मॉडेल राज्य बनवून दाखवा. तर मोदींशी तुलना होऊ शकेल, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.  यावेळी बोलताना मुनगंटीवारांनी सेना-भाजप युतीवर भाष्य केलं.

दरम्यान, जे पक्ष देशहितासाठी आणि हिंदुत्वासाठी काम करतात, त्या पक्षांना आम्ही आमच्याकडून तरी मित्र समजत असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

…तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थांबवता येईल – मोदी सरकार

सोन्याचा भाव आज पुन्हा उतरला, वाचा ताजे दर

काॅंग्रेसला बाजूला ठेवत राष्ट्रवादी तिसरा फ्रंट काढणार? पवारांच्या बैठकीमुळे चर्चांना उधाण

“भाजपच्या ‘या’ नेत्याने फडणवीसांनी तिकीट कापून वेशीवर का टांगलं याचं चिंतन करावं”

कौतुकास्पद! मुलीला पाठीवर घेऊन नदी ओलांडणाऱ्या महिला नर्सचा फोटो व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More