बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तालिबानची पहिली पत्रकार परिषद, जगाला केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन!

काबूल | अफगाणिस्तानवर आक्रमण करून तालिबानने संपुर्ण देशावर ताबा मिळवला आहे. तालिबानी कोणतं पाऊल उचलतात याकडे सर्व जगाचं लक्ष लागलेलं होतं. अशातच तालिबानने पत्रकार परिषद घेत जगाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. तालिबानने ताबा मिळवल्यावर पहिली पत्रकार परिषद घेतली आहे.

तालिबानी कोणत्याही आंतरराष्ट्रीय दूतावास किंवा संस्थेला नुकसान पोहोचवणार नाहीत. तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय समुदयाने परवानगी दिली असल्याचं तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिदी यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं आहे.

आमच्यासोबत आधी जे लढले आहेत त्यांना आम्ही माफ केलं आहे. तालिबान कोणाचाही बदला घेणार नसून मी आश्वासन देतो की आमची माती चुकीच्या कामासाठी वापरली जाणार नाही. आम्हाला आंतरराष्ट्रीय समुदाय ओळखेल अशी आशा असल्याचं जबीहुल्ला मुजाहिदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, इस्लामनुसार सर्व महिलांना शाळा आणि रूग्णालयांमध्ये काम करण्याची परवानगी असणार आहे. त्यासोबतच महिलांना सर्व अधिकार मिळणार असून त्यांच्यासोबत कोणताही भेदभाव केला जाणार नसल्याचं प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिदींनी सांगितलं.

 

थोडक्यात बातम्या- 

पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा पुण्याची आजची आकडेवारी!

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यावर तालिबान्यांनी दिला ‘हा’ पहिला आदेश!

चार दिवसांपासून खासदार उदयनराजे रुग्णालयात, पुण्यात उपचार सुरु!

कार प्रेमींसाठी जबरदस्त बातमी, ‘ही’ जबरदस्त गाडी लवकरच लाँच होणार!

“तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला, महाराष्ट्राला जास्त सतर्क रहायला हवं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More